Ad will apear here
Next
परिते येथील भैरवनाथ यात्रेला प्रारंभ
सोलापूर : परिते (ता. माढा) येथील भैरवनाथाच्या यात्रेला आजपासून (१८ फेब्रुवारी) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेसाठी गावात भक्तगणांची मांदियाळी जमली आहे.

सालाबादप्रमाणे याही वर्षी गावकरी व यात्रा पंच कमिटीने यात्रेची जय्यत तयारी केली आहे. भल्या पहाटे भाविकांनी मंदिरात दंडवत घातला. त्यानंतर श्रींना अभिषेक व आकर्षक पोषाख चढवला. दिवसभर भाविकांनी मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी श्रींचा छबिना निघणार आहे. यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

‘हा देव नवसाला पावणारा असल्यामुळे सायंकाळी नवसाच्या शेरण्या वाटल्या जाणार असून, मंदिरावरून लहान बालकांना झेलण्यात येईल,’ अशी माहिती अजय पवार व उमेश पवार यांनी दिली. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZOIBX
Similar Posts
रोपळे येथे साखरेचे अल्प दरात वाटप सोलापूर : विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातर्फे कारखान्याच्या सभासदांना अल्प दरात साखरेचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. आमदार बबनराव शिंदे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सणासुदीच्या दिवसांत घरपोच साखर मिळाल्याने सभासदांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
‘आई... बाबा... मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’ सोलापूर : ‘आई... बाबा... तुम्ही मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा...!’ असा संदेश सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या पालकांना पत्राद्वारे देणार आहेत. सोलापूर व माढा या लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे.
गाडगेबाबा प्रबोधन कक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी राधेश बादले-पाटील सोलापूर : मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून पंढरपूरचे राधेश बादले-पाटील यांची निवड झाली. मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे २३ जून २०१९ रोजी ही निवड जाहीर केली.
सोलापूरला ऊस तोडणी कामगारांसोबत दिवाळी साजरी सोलापूर : माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांनी ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांबरोबर दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकी जपली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language